FAIL (the browser should render some flash content, not this).

डंगिरेवाडी भंडारा


भंडारा म्हणजे देवाच्या नावाने देवाच्या प्रांगणात अन्नदान करणे. भंडारा हा नवस पूर्तीसाठी तर कधी अन्नदानाची ईच्छा म्हणून केला जातो. भंडाऱ्याच्या नैवेद्याचे माप ठरलेले असते (सव्वा मण किव्हा अडीच मण सामग्री). देवासाठी दही-भाताची पूजा देखील केली जाते.दहीभाताच्या पूजेची सामग्री पुढील प्रमाणे असते.
- पाच चिपटे तांदूळ
- एक चिपटे डाळ
- एक मापटे कणिक
- मीठ, तेल, गुळ
- दही, दूध, तूप (महादेवाच्या अभिषेकासाठी)
हे साहित्य पुजाऱ्याना दिले जाते.

महादेवाची पूजा करताना पिंडीवर संपूर्णपणे दही भाताचा लेप लावला जातो. नंतर तोच दही भाताचा प्रसाद सर्वाना दिला जातो. जर भंडारा असेल तर संध्याकाळी गाव जेवण आसते. या जेवणात पुरणपोळी, लाडू, लापशी, शिरा, जिलेबी, भात, आमटी, पुरी, भाजी यापैकी जिन्नस निवडला जातो. हा जिन्नस अन्नदान करणारा ठरवतो. त्याप्रमाणे लागणारे साहित्य तो पुजाऱ्याना पुरवतो. भंडाऱ्याच्या स्वयंपाकापासून ते जेवणापर्यंत सर्व गावकरी मदत करतात. दिवसभर देवळात देवाची गाणी लावली जातात. लाडू तयार करताना गाणी म्हटली जातात. संध्याकाळी जेवणाच्या पंगतीत श्लोक म्हटले जातात. संपूर्ण वातावरण प्रसन्न होऊन जाते.