FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर मोठा महादेव


महाराष्ट्र हा संतानी पराक्रमी पुरुषांनी आणि देवीदेवतांच्या वरदहस्तानी फुलवलेला संपन्न प्रदेश आहे. महाराष्ट्रातील असंख्य धार्मिक स्थळे खूप प्राचीन, स्वयंभू आणि जागृत इतिहास असूनही महाराष्ट्राच्या नकाशावर अनभिज्ञ आहेत. यातीलच एक धार्मिक ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर.

या संकेत स्थळाच्या माध्यमातून शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची माहिती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर ज्ञात व्हावी याच हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.

या संकेत स्थळावर आम्ही शिखर शिंगणापूर बद्दल दिलेली सर्व माहिती आम्ही तेथे भेट देऊन संपादित केली आहे. शिखर शिंगणापूर मधील रहिवासी, तेथील जुनी व जाणकार मंडळी, मंदिरातील पुजारी तसेच आसपासच्या गावातील लोक या सर्वांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही हे संकेत स्थळ उभे करू शकलो. म्हणून प्रथम या सर्वांच आभार. तसेच अजूनही काही मंडळी आहेत ज्यांनी या संकेत स्थळ कार्यरत होण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आभार.

शिखरशिंगणापूर.कॉम या संकेत स्थळावर शिखर शिंगणापूरच्या इतिहास, तिकडचा परिसर, तिकडची यात्रा, परंपरा, रूढी तसेच वर्षभर देवळात राबवण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जर आपणाकडे अजूनही काही माहिती असेल तर तुम्ही ती माहिती आमच्याकडे पाठवून हे संकेतस्थळ अजूनही उपयुक्त करू शकता.